पारदर्शकतेने कार्यवाही करत पदभरती करण्याचे बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश
मुंबई दि. 5 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंर्तगत होणाऱ्या पदभरतीत पारदर्शकतेने कार्यवाही करत पदभरती संदर्भातील नियमावली तपासून पदभरती करावी, असे निर्देश बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक गट ब पदाच्या भरती प्रक्रियेत धनगर समाजाच्या मुलांना आरक्षण नाकारल्याबाबत तसेच ओबीसी व भटक्या विमुक्त समाजाच्या प्रलंबित मागण्या विषयी बैठक बहुजन कल्याणमंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयीन दालनात झाली.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश शेंडगे, विमुक्त व भटक्या जमाती विभागाचे सचिव जे.पी. गुप्ता, धनगर समाजाचे प्रतिनिधी उत्तम जानकर तसेच आदी अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत होणाऱ्या पदभरतीत विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. यासाठी लवकरात लवकर पदभरती संदर्भातील भटक्या विमुक्त समाजाला असलेले आरक्षण संबंधित नियमावली तपासून त्यानुसारच भरती प्रक्रिया करावी व याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश श्री.वडेट्टीवार यांनी दिले.

यावेळी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी समांतर आरक्षणाच्या आदेशाबाबत शासनाने भूमिका घ्यावी, अशीही मागणी यावेळी प्रतिनिधींनी केली.

थोडे नवीन जरा जुने