परदेश प्रवास न करताही आढळला आणखी एक कोरोना रुग्ण !

अहमदनगर :- जिल्हा शासकीय रुग्णालयाने सोमवारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवलेल्या १३ स्त्राव नमुन्यांपैकी जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले.


त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. हा रुग्ण नगर शहरातील असून, तो वैद्यकीय क्षेत्रातील असल्याचे समजते. 

त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये, संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 

दरम्यान, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळी दीड ते दोन हजार व्यापारी, शेतकरी व नागरिक एकत्र आल्याचे चित्र दिसले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हे संकट जास्त वाढू नये, 

यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कायद्याचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
थोडे नवीन जरा जुने