चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांबाबत आढावा
मुंबई  : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि परिचर्या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रकियेला शासनाने मान्यता दिली असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
विधानभवनात श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक झाली.

या वैद्यकीय महाविद्यालयाचे इमारत बांधकाम गतीने आणि दर्जेदार करण्याबाबत तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रसामुग्री, औषधपुरवठा आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीविषयी आरोग्य विभाग,एचएससीसी, वैद्यकीय शिक्षण विभाग, हाफकीन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची विधानभवनात संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश श्री. देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले.

या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, तंत्रशिक्षण संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने