शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : अश्या पद्धतीने शेतकऱ्यांचा शेतीमाल जाणार !अहमदनगर- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर २१ दिवसांचा लाॅक डाऊन केला आहे.
अगोदरच पोळलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. आता त्यावर काहीअंशी मार्ग निघत आहे.

कृषी विभाग व गावपातळीवरील शेतकरी गटांच्या माध्यमातून आता द्राक्ष व कांदा वगळता इतर भाजीपाला व फळे पुण्यातील मार्केटला नेण्याची व्यवस्था केली जात आहे.

लाॅक डाऊन होण्यापुर्वीच शेतातील पीके जागीच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २१ दिवसांचा कडक लाॅक डाऊन केल्याने शेतकऱ्यांच्यापुढच्या अडचणी वाढल्या आहेत.

श्रीगोंद्याचे तालुका कृषी अधिकारी पदनाभम म्हस्के म्हणाले, संबधीत शेतकऱ्यांनी गावातील गटप्रमुखाशी संपर्क करावा.

गटप्रमुख आमच्या माध्यमातून पुणे येथील कृषी आयुक्तालयाशी संवाद साधून वाहनातून शेतीमाल पुण्यात नेण्याची व्यवस्था होईल.

कृषी आयुक्तालय व पुणे महानगरपालिका सयुंक्त नियोजन करीत आहे.

द्राक्ष व कांदा या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने तुर्त ही पिके बाजूला ठेवली आहेत.

वाहनचालकांना अडचण नको म्हणून तालुका कृषी विभाग त्यांना विशेष परवाने देणार आहे.
थोडे नवीन जरा जुने