तासगाव, खानलोशी, माजलगाव एमआयडीसीसंदर्भात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई : नवीन एमआयडीसीबाबत उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत सांगली जिल्ह्यातील तासगाव, रायगड जिल्ह्यातील खानलोशी, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एमआयडीसीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
रितसर नियमावलीने एमआयडीसीकरिता आवश्यक तेथे भूसंपादन करून तसेच एमआयडीसीबाबतची आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करून याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना यावेळी कुमारी तटकरे यांनी दिल्या.

यावेळी एमआयडीसी चे अविनाश सुभेदार, उपसचिव भोसले, अपर सचिव किरण जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने