बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टला राम राम


मायक्रोसॉफ्टचे संस्थापक, यशस्वी उद्योगपती आणि सामाजिक कामं यामुळं बिल गेट्स कायमच चर्चेत राहिलेत. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.

 मायक्रोसॉफ्टसचे सहसंस्थापक असलेले गेट्स 2008 सालापासूनच कंपनीच्या दैनंदिन कामातून बाजूला झाले होते. आता ते पूर्णपणे कंपनीतून बाहेर पडलेत.
 जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स हे दुसऱ्या स्थानावर आहेत.
कॉलेज सोडल्यानंतर बिल गेट्स न्यू मेक्सिकोतील आल्बुकर्की शहरात गेले आणि तिथं बालपणीचा मित्र पॉल अॅलन यांच्या सोबतीनं मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. 
बिल गेट्स हे  गेट्स फाऊंडेशनचं काम करतात. पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या मदतीनं त्यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली.
थोडे नवीन जरा जुने