रिपब्लिकन जनआंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, दि. 5 : विविध पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना आणि संस्था यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या रिपब्लिकन जनआंदोलन या सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री म्हणाले, संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मकतेने आणि सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून योग्य निर्णय घेतले जातील. जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने