पुण्यात ३३१ जण निरीक्षणाखाली


पुणे : अमेरिका येथून  पुण्यात आलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत कोरोना बाधितांची संख्या १० झाली आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 सध्या विविध ठिकाणी ३३१ जण निरीक्षणाखाली आहेत. पुण्यात आतापर्यंत ३४४० जणांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, तर परदेशातून आलेल्या ७०० प्रवाशांचा सध्या पाठपुरावा सुरू आहे. 

आजपर्यंत २३३ जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यातील २२४ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १० जणांचा अहवाल कोरोनाबाबत सकारात्मक आला आहे.

 नऊजणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असेही डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने