बसून काम करण्याचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा निकटचा संबंध


बसून काम करण्याचा आणि हृदयविकाराच्या झटक्याचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यक्षम राहा, कमीत कमी बसा, असा सल्ला अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी शास्त्रज्ञांनी ४५ ते ६९ वयोगटातील तब्बर ९० हजार पुरुषांची तपासणी केली. या संशोधनात व्यक्तीच्या शारीरिक ऊर्जेचा अभ्यास करण्यात आला. 

शारीरिक व्यायाम न करणारया ५२ टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा दोष आढळला. आठ वर्षे सतत संशोधन केल्यानंतर हे निष्कर्ष मिळाले आहेत. कामाव्यतिरिक्त पुरुष हे पाचहून अधिक तास दिवसातून बसत असतात. 

त्यामुळे त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण ३४ टक्क्याहून अधिक आढळले. हे संशोधन कामाव्यतिरिक्त बसणा-या व्यक्तींसाठी करण्यात आले. या अभ्यासाला अमेरिकन हार्ट असोसिएशनने अर्थसाहाय्य केले. 

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दीडशे मिनिटे एरोबिक्स करण्याची शिफारस शास्त्रज्ञांनी केली आहे. त्याचप्रमाणे शक्य तितके चालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
थोडे नवीन जरा जुने