आयपीएल सामन्याला दिल्ली सरकारचा नकार


नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या भयापोटी दिल्ली सरकारने फिरोझ शाह कोटलावर आयोजित केलेल्या सामन्याला विरोध दर्शवला आहे. हे सामने दिल्लीत होणार नसल्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्यावर बीसीसीआय आता पर्यायी ठिकाणाचा शोध घेत आहे. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून दिल्लीत या महिन्यात कोणत्याही खेळांच्या स्पर्धा होणार नाहीत, असे शुक्रवारी जाहीर केले. बीसीसीआयच्या आयपीएलला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती आणि दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना ३० मार्च रोजी होणार होता. 

लखनौ आणि कर्नाटकने आयपीएलच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांनुसार जर आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना होणार असतील, तर ते कोठेही खेळले गेले, तरी फरक पडणार नाही.
थोडे नवीन जरा जुने