मौजे लोनाडच्या संरक्षक भिंतीसाठी वृक्षतोड नाही
मुंबई : भिवंडी येथील मौजे लोनाड येथील परिसरात गल्फ ऑइल कॉर्पोरेशन यांनी वृक्षांची कत्तल न करता संरक्षण भिंत बांधली असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.
सदस्य महेश चौगुले यांनी ठाणे जिल्ह्यातील लोनाड येथे वृक्षतोड करून अनधिकृत बांधकाम करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. राठोड बोलत होते.

मंत्री श्री.राठोड म्हणाले, भिवंडी येथील श्रमजीवी संघटना यांनी लोनाड या ठिकाणी गल्फ ऑईल कॉर्पोरेशन ही कंपनी रस्त्याचे खोदकाम करते अशी तक्रार केली होती. मात्र, याची शहानिशा केली असता, अद्याप कोणतेही अनधिकृत खोदकाम करण्यात आले नसल्याचे आढळून आल्याची माहिती मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी दिली.

वनांमध्ये लागणारा वणवा विझविण्यासाठी वन विभागाकडे यंत्रणा आणि उपाय असल्याची माहिती मंत्री श्री. राठोड यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना दिली.
थोडे नवीन जरा जुने