नाशिक ब्रेकिंग : २७ वर्षीय युवकाचा खून, मृतदेह कालव्यात फेकुन दिला

नाशिक :-  निफाड तालुक्यातील नैताळे येथील २७ वर्षीय युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल दत्तु पवार (वय 27) असे या युवकाचे नाव आहे.


युवकाचा खून करून नाशिकच्या पालखेड डावा कालव्यात फेकुन दिला होता. म॔गळवारी रात्री विंचुर येथील प्रतापसागर जलाशयाजवळ मृतदेह मिळून आल्याने घटना उघडकीस आली. 

याप्रकणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लासलगाव पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता सदर मृतदेह निफाड तालुक्यातील नैताळे येथील अनिल दत्तु पवार (वय 27 रा. घायाळ गल्ली ,गाजरवाडी) याचा असल्याचे समोर आले.
थोडे नवीन जरा जुने