चोरी करण्यासाठी गेला आणि तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केला...


अकोले :- तालुक्यातील खानापूर येथील महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे
खानापूर येथील एका मतीमंद तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस पोलिसांनी रविवारी पहाटे म्हाळादेवी शिवारातून अटक केली.

७ मार्चला या तरुणीवर अत्याचार करुन खून झाल्याची घटना घडली. याबाबत खून व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान आज सकाळी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सोमनाथ बाळासाहेब गायकवाड (वय ३०, रा.टाकळी) यास अटक केली आहे.

बोकड चोरण्याच्या इराद्याने गेलेल्या गायकवाड याची नियत फिरली आणि शेळ्या चारणा-या तरुणीवर त्याने बलात्कार करून तिचा खून केला.

दरम्यान या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अजून एक साथीदार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
थोडे नवीन जरा जुने