हे वाचा आणि घरच्या-घरीच हे नैसर्गिक उपचार करा


आरोग्याशी निगडित किरकोळ स्वरूपाच्या समस्यांवर घरगुती उपाय केले जातात. स्वयंपाक घरात वापरले जाणारे अनेक पदार्थ यासाठी उपयुक्त ठरतात. नैसर्गिक उपचार पद्धतीचे तज्ज्ञ फिलिप्स विक्स यांच्यानुसार घरगुती उपचाराचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे हे उपाय करणे योग्य ठरतात.


पुदिना
गुण : पोटदुखी, शौचास साफ न होणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त

पोटदुखीवेळी पुदिना तेल गुणकारी ठरते.र्जमनीमधील हॅँडेन्बर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार तोंडातील फोडांवर आणि उष्णतेच्या उपचारासाठी पुदिन्याचा वापर करता येतो. यात असलेली किटाणू प्रतिरोधक शक्ती संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाची ठरते.


तेज पान
गुण : किड्यांनी चावले असल्यास किंवा त्वचेवर झालेल्या आजारातील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त

तेज पत्त्यामध्ये जखम चिघळण्यास विरोध करणारे (अँटिसेप्टिक) गुणधर्म असल्याने प्राचीन काळापासून याचा वापर केला जातो.

दात स्वच्छ करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. गरोदरपणानंतर होणार्‍या उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी याचा वापर गुणकारी ठरतो, असा दावा एक्सीटर विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.


ओवा
गुण : शरीरातील केमिकलची होणारी हानी टाळण्यासाठी ओवा मदत करतो.


ओव्यात असणारे अँटिऑक्सिडेंटस विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी सहायक ठरतात. ओव्याचे तेल प्रतिकाररोधकासारखे असून तो स्टेफिलोकोकस नावाच्या जीवाणूंचा नाश करतो. एका अमेरिकन संशोधनानुसार ओव्यात सफरचंदपेक्षा 42 पट, बटाट्यापेक्षा 30 पट तर संत्र्यापेक्षा 12 पट जास्त अँटिऑक्सिडेंटस असतात.


दालचिनी
गुण : घसा दुखणे किंवा इतर समस्या दूर करण्याचे काम दालचिनी करते.
दालचिनीत असणारे अँटिऑक्सिडेंटस घशात संसर्ग निर्माण करणार्‍या किटाणूंचा नाश करतात. त्याचप्रमाणे या भागातील पेशींना होणारा संसर्गाचा धोका कमी करतात. एक कप पाण्यात दालचिनी टाकून गरम करावे आणि या कोमट पाण्याने चुळा भराव्यात.


तोंडाला चव येईल : चहामध्ये तुळशीची काही पाने टाकावीत. ज्या व्यक्तींच्या तोंडाला चव लागत नाही त्यांनी नियमित हा प्रयोग करावा.


स्वच्छ चेहर्‍यासाठी : तीन चमचे मध आणि एक चमचा दालचिनी पावडर एकत्र करून पेस्ट तयार करावी. झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी. सकाळी चेहरा स्वच्छ करावा.


भीती वाटल्यास : एक चमचा आल्याची पावडर, एक कप सफरचंदाचा रस आणि अर्धा कप पाणी यांच्या मिर्शणाचे सेवन करावे.


तोंडातील फोडावर उपाय : खडीसाखर आणि कापूर वाटून तोंडातील फोडांवर लावावा. काही दिवसांत आराम मिळतो.

काळे डाग गायब : मेथीची पाने किंवा दाणे पाण्यात भिजवून वाटावीत आणि ही पेस्ट डागांवर लावावीत. थोड्या वेळानंतर कोमट पाण्याने ते साफ करावे.


2008 मध्ये झालेल्या एका पाहणीनुसार इंग्लंडमधील 35 टक्के नागरिक नैसर्गिक उपचार पद्धतीवर विश्वास ठेवतात
थोडे नवीन जरा जुने