शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ-- शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू




मुंबई: राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती
योजनेअंतर्गत 10-20-30 असा लाभ देण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. कडू म्हणाले, सगळ्यांना हा लाभ लागू असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येऊन पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी हा लाभ देण्यात येईल , असेही ते म्हणाले.

याविषयी सदस्य डॉ. सुधीर तांबे, डॉ. रणजीत पाटील, विक्रम काळे, कपिल पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
थोडे नवीन जरा जुने