जाणून घ्या, कशामुळे होते केसांचे नुकसान?


सुंदर केस असावेत, असे सर्वांनाच वाटते. मात्र, त्यांचे नुकसान करणार्‍या घटकांपासून आपण अनभिज्ञ असतो. यामुळे केसांशी संबंधित समस्या सुटत नाहीत.
जाणून घ्या, कशामुळे होते केसांचे नुकसान?

हेअर डाय


अवेळी केस पांढरे होण्यासाठी हेअर डायमध्ये असलेले केमिकल्सही जबाबदार असतात. त्यामुळे नेहमी चांगल्या कंपनीच्या हेअर प्रॉडक्ट्सचाच वापर करावा. तसेच अँनिमिया, थायरॉइड किंवा शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असणे किंवा आनुवंशिकता इत्यादी आरोग्य समस्यांमुळेदेखील केस पांढरे व्हायला लागतात.


पोषक द्रव्यांचा अभाव

लो कॅलरी डाएटमुळे शरीरात पोषक द्रव्यांची कमतरता भासते आणि केस गळायला लागतात. केसांना प्रथिने, लोह, ओमेगा-3 फॅटी अँसिड्स, झिंक आणि अ जीवनसत्त्वाची गरज असते. जेवणात पालक, गाजर, सुका मेवा, मासे, अंडी आणि सर्व प्रकारच्या धान्याचा समावेश केला पाहिजे.


उन्हाचा परिणाम

बराच वेळ कडक उन्हाच्या संपर्कात आल्याने केस कोरडे आणि कमकुवत व्हायला लागतात. ज्या लोकांचे केस आधीपासूनच पातळ झाले आहेत त्यांच्या डोक्याच्या त्वचेवर सनबर्नही होऊ शकतो. त्यामुळे केसांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर नेहमी कपडा बांधला पाहिजे.


हेअर कलर्स किंवा केस रंगवणे इत्यादी अतिहेअर ट्रीटमेंट मी करत नाही. कारण यामुळे केसांना नुकसान पोहोचते. - अनुष्का शर्मा, अभिनेत्री
थोडे नवीन जरा जुने