भूकंपग्रस्त गावांतील रहिवाशांना घरे देण्याबाबत शासन सकारात्मक - वनमंत्री संजय राठोड


मुंबई: मौजे कारला व कुमठा गावातील एकूण १८४८ पैकी ११६६ घरांचे वर्गीकरण करण्यात आले. क वर्गातील बाधित घरे एकूण ७४९ एवढी होती. नुकसान झालेल्या निकषानुसार काहींना ३४ हजार तर काहींना १७ हजार एवढे अनुदान देण्यात आले आहे. नुकसानगुस्त गावकऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.
सदस्य अभिमन्यु पवार यांनी मौजे कारला व कुमठा या भूकंपग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.राठोड यांनी उत्तर दिले.

मंत्री श्री.राठोड म्हणाले, या दोन्ही गावात १८४८ गावे होती. भूकंपामुळे बाधित असलेल्या घरांना अनुदान देण्यात आले आहे. मात्र, त्यांना घरे देण्यासंदर्भातील जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या घरांसाठी दीड लाखांपेक्षा जास्त अनुदान देण्यात येईल का, याबाबत प्रस्तावाअंती शासन सकारात्मक विचार करेल.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
थोडे नवीन जरा जुने