शेतातील सागरगोटीच्या झाडाला शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


चिखली :- एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील सागरगोटीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २३ मार्चला तालुक्यातील एकलारा येथे घडली. 

एकलारा येथील रहिवासी फकिरा तेजराव अंभोरे (४०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. फकिरा अंभोरे हे सकाळी सात वाजता घरून गुरांचे चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेले होते. 

रम्यान, त्यांनी एकलारा शिवारातील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
थोडे नवीन जरा जुने