वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार


चंद्रपूर : शिवणी वनपरिक्षेत्रात सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर (मोहाली) येथील शेतकरी माणिक नन्नावरे हे दुबार पेरणी केलेल्या शेतीला पाणी देण्यासाठी आपल्या शेतावर गुरुवारी सायंकाळी गेले होते.

 शेत हे नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला लागून असून, कालव्याच्या डाव्या बाजूला महसूल विभागाच्या गट क्र. ११ मध्ये झुडपी जंगल आहे.

 तेथून ते जात असताना एका वाघाने केलेल्या हल्ल्यात माणिक नन्नावरे ठार झाले. ते रात्री घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी त्यांचा शोध घेतला असता, माणिक यांचा लचके तोडलेला मृतदेह दिसून आला. 

शिवणी वनपरिक्षेत्रात मागील एक महिन्यापासून वाघाचा धुमाकूळ सुरू असून, आतापर्यंत २ जण ठार, तर १ जण जखमी झाला असल्याने या भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
थोडे नवीन जरा जुने