‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द




मुंबई : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने 35 लाखांचा‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’ साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी आज मंत्रालयात सुपूर्द केला.

संपूर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक,धार्मिक संस्था, वित्तीय संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने 35 लाखांचा धनादेश देण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने