साकोली उपजिल्हा रूग्णालयातील खाटांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी आढावा बैठक
मुंबई : साकोली उपजिल्हा रूग्णालयातील ५० खाटांच्या क्षमतेत वाढ करून १०० खाटांमध्ये रूपांतर करण्याबाबत व सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील दालनात बैठक झाली .
रुग्णालयातील रूग्णांना सुयोग्य आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयाच्या खाटांच्या क्षमतेत वाढ करून १०० खाटांमध्ये रूपांतर करण्याबाबत व सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

रुग्णालयासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीची उपलब्धता करणेबाबत शासन सकारात्मक असल्याचे विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी सांगितले.

यावेळी आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ.अनुपकुमार यादव, आरोग्य सेवा संचालक डॉ. तायडे, उपसंचालक डॉ. जयस्वाल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, सह सचिव मनोहर ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय सगणे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने