संजय काकडे आणि एकनाथ खडसे यांचा पत्ता कट


मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपने दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपने संजय काकडे यांचा पत्ता कट केलाय. याशिवाय ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही तिकीट दिलेलं नाही. .



भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन 7 पैकी 3 जागांवर दावा केला आहे. उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांनी आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसे यांना स्थान मिळाले नसल्याचं दिसत आहे.
थोडे नवीन जरा जुने