मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देणार - जलसंपदामंत्री जयंत पाटील


मुंबई : एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत असलेल्या योजनांचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीच्या शिफारशींनुसार मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा प्रदेशात कोकणातील नार पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून एकूण 89.85 अघफू पाणी वळविण्याबाबत आखणी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या पैकी 2.43 अ.घ.फू. पाणी वळणाच्या बांधकामाधीन आहेत. 

25.55 अ.घ.फू. पाणी वळणाबाबत पार-गोदावरी, दमणगंगा पिंजाळ पूर्ण झाल्यावर उर्ध्व वैतरणा ते गोदावरी नदीजोड व दमणगंगा- पिंजाळ पूर्ण व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आले आहे. उर्वरित 61.88 अघफू पाणी वळविण्यासाठीच्या काही योजना प्रस्तावित तर काही प्रकल्पाधीन आहेत. अहमदनगर, जळगावसह मराठवाड्यातील क्षेत्र सिंचनाखाली आणणार आहे, असेही त्यांनी उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

या विषयी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री अंबादास दानवे, विनायक मेटे, सुरेश धस, शरद रणपिसे, जयंत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
थोडे नवीन जरा जुने