राज्याला अवकाळी पा‌वसानेही दिला तडाखा

औरंगाबाद :- बुधवारी राज्याला अवकाळी पा‌वसानेही तडाखा दिला. औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा जिल्ह्यामध्ये वीज कडकडाटांसह दुपारी व सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. 


या पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सोंगणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मका ही पिके आडवी झाली.नाशिक जिल्ह्यात कांदा आणि द्राक्ष बागांचे नुकसान झाले. 

मराठवाडा : बुधवारी सायंकाळी साडेसहानंतर जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील शहागड, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, जालना आदी तालुक्यांत पाऊस बरसला.
थोडे नवीन जरा जुने