मुलीला पळवून नेल्याच्या रागातून झाेपेतच मुंडके छाटून तरुणाची हत्या !

वैजापूर :- मुलीला पळविल्याच्या रागातून मुलीच्या बापासह चुलत्याने प्रियकराचे आई-वडील व अल्पवयीन भावावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अल्पवयीन भावाचा मृत्यू झाला असून, आई-वडील गंभीर जखमी आहेत. ही घटना लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे शनिवारी रात्री घडली.मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून लाख खंडाळा येथील देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या भावांनी एका दलित कुटुंबावर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका निरपराध युवकाचा जीव गेला.

भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) या युवकाचे झाेपेतच मुंडके छाटून सूड उगवण्यात आला. या हल्ल्यात भीमराजचे वडील बाळासाहेब आणि आई अलकाबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृत युवकाच्या वडिलांनी १३ मार्च रोजी वैजापूर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन आपल्या जिवाला धोका असल्याचे कळवले होते. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नसल्याने एका निरपराधाचा बळी गेला.

याप्रकरणी अलका बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास छगन देवकर व रोहिदास छगन देवकर या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुनासह अस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडे नवीन जरा जुने