अरे देवा ! कोट्याधीश असणाऱ्या शरद पवारांकडे नाही एकही चारचाकी गाडी...


टीम महाअपडेट :- राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी महाराष्ट्रातून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी त्यांनी जोडलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे.यावरून पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली.शरद पवार यांची संपत्ती गेल्या सहा वर्षांत ६० लाखांनी वाढल्याचं दिसतं, त्यांनी दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रानुसार शरद पवार यांची संपत्ती ३२.७३ कोटी रुपये एवढी आहे.

या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्यावर 1 कोटी रुपयांचे कर्जही आहे. तर, पत्नी प्रतिभा पवार यांना अडव्हान्स डिपॉझिट म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचेही या शपथपत्रात सांगण्यात आले आहे.तसेच धक्कादायक माहिती म्हणजे कोट्याधीश असलेल्या शरद पवार यांच्याकडे एकही चारचाकी गाडी नाहीय.


शरद पवार यांच्याकडे 29 हजार 570 रूपये तर पत्नी प्रतिभांकडे 25 हजार 750, तसेच एकत्र कुटुंब म्हणून दहा हजार 360 रूपयांची रोकड आहे.विविध बॅंकांत त्यांच्या नावावर तीन कोटी 37 लाख 14 हजार 851 रूपये तर पत्नी प्रतिभा यांच्यानावे बॅंकेत दोन कोटी 58 लाख 89 हजार 280 रूपये तर हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून तीन कोटी 43 लाख 89 हजार 258 रूपये त्यांच्या खात्यावर आहेत.

शरद पवार यांच्याकडे 38 लाख 17 हजार 422 रूपयांचे 848.07 ग्रॅम सोने असून सहा लाख 70 हजार 179 रूपयांचे 15 हजार 171 ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. एकुण 44 लाख 87 हजार 601 रूपयांचे दागिने आहेत. तर पत्नी प्रतिभा यांच्याकडे 19 लाख 59 हजार 970 रूपयांच्रे 414.528 ग्रॅम सोने, सात लाख 54 हजार 111 रूपयांचे 17 हजार 071 ग्रॅम चांदी असे एकुण 27 लाख 14 हजार 081 रूपयांचे दागिने आहेत.

शरद पवार व त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे माळेगाव व ढेकळवाडी (ता. बारामती) येथे शेती असून श्री. पवार यांच्या नावे साडे सहा एकर शेती असून त्यांची बाजारभावाप्रमाणे 65 लाख 81 हजार 200 रूपये किंमत असून प्रतिभा पवार यांच्या नावे 3.90 एकर जमीन असून त्याची किंमत 65 लाख 81 हजार 760 रूपये आहे.

संपत्ती विवरण पत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार बिगर शेती जमीनीमध्ये माळेगावमध्ये 50 लाख 47 हजार 320 रूपये किंमतीची 4.32 एकर जमीन आहे. तर पत्नी प्रतिभा यांच्या नावे 41 लाख, 24 हजार 160 रूपये किंमतीची 4.8 एकर जमीन आहे. वाणिज्य वापराची मालमत्तेमध्ये श्री. पवार यांच्या नावे पुण्यात 2850 स्वेअर फूट अपार्टमेंट असून त्याची किंमत 88 लाख 68 हजार 300 रूपये आहे. शरद पवार व त्यांच्या पत्नीच्या नावे एक रूपयांचेही कर्ज नाही.
थोडे नवीन जरा जुने