भाजपचे हे नेते म्हणतात लवकरच महाविकास आघाडी सरकार कोसळेल !


अहमदनगर :- भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला फक्त मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी खुन्नस काढत आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. 

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवार दि. 1 मार्च दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात युती सरकारने घेतलेले जलयुक्त शिवारसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय रद्द करण्यात येत आहेत.

हे निर्णय घेताना मागील सरकारमध्ये आपणही होतो, याचा शिवसेनेला विसर पडला आहे. सध्याचे सरकार कोण चालवत आहे याचा शिवसेनेने विचार करायला हवा़ आमचे विरोधी पक्ष म्हणून बरे चाललेय.

शिवसेना सरकारमध्ये असूनही अस्वस्थ आहे का? त्यांनाच विचारा. हिंदुत्व सोडून ते समाधानी असतील तर जनताच निर्णय घेईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भिमा कोरेगावचा तपास केंद्राकडे सोपविण्याचा निर्णय घेतात.

तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्याला विरोध करतात. अनेक निर्णयामध्ये या तिन्ही पक्षांत एकवाक्यता नाही. भाजप हे सरकार पाडणार नाही. तशी गरजही नाही. आपसातील विसंवादामुळेच हे सरकार आपोआप कोसळेल, असा दावाही पाटील यांनी केला.


mahaupdate.in वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mahaupdate@gmail.com वर 

This Story First Publish on Mahaupdate.in ®


Latest Marathi News Updates And Information Of Maharashtra


थोडे नवीन जरा जुने