काय होईल जर सलग 72 तास तुम्ही झोपलेच नाही तर ?

24 तास जागे राहिल्यास एकादी व्यक्ती 24 तासापेक्षा अधिक काळ जागी राहिल्यास त्याच्या आकलनशक्तीवर परिणाम होतो असे संशोधकांचे मत आहे. त्यामुळे कार्यक्षमतेने काम करण्याची मनाची क्षमता बाधीत होते. खूप वेळ जागे राहिल्यास एकाग्र होण्याची आणि लक्ष्य देण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

रक्तात 0.10 सरासरी अल्कोहोल असल्यास जसा परिणाम होतो तासाच परिणाम झोप टाळणे किंवा न घेणे यामुळे होतो. आपली स्मरणशक्ती चांगल्याप्रकारे काम करत असते. पण चोवीस तास जागे राहिल्यास परिणाम हात डोळे यांच्या संयुक्त कृतीवर दिसून येतो , तसेच निर्णय क्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. आपल्या कामात सतत अडथळा येतो आणि कामगिरीवर परिणाम होतो.
36 तास जागे राहिल्यास जितका अधिक काळ शरीरावर आणि मनावर ताण पडेल तितकी आपली अवस्था वाईट होईल. 36 तास ना झोपल्यास त्याचा परिणाम मेंदूवरच नाही तर हृदयावरही होतो . हृदयाची दडदड वाढते आणि रक्तदाबही विस्कळीत होतो. आपल्या आकलन कॊशल्यावर परिणाम होऊन लोकांचे चेहरे ओळखण्यास अडचण होईल आणि शब्द आठवणे कमी कमी होईल आणि आपल्या आरोग्याला खूप जास्त धोका पोचेल.

48 तासांचे जागरण 48 तास जागरण केल्यास शरीर आणि मन दोघांवर सर्वोच ताण जाणवतो राहिल्यास. 48 तास जागल्याने आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात सांगण्यात आला आहे. त्यामुळे रोगांशी , संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते आणि आपले शरीर विविध आजारांना बळी पडते.

72 तास जागरण 72 तास जागणे म्हणजे आरोग्याशी खेळच आहे . सर्वच गोष्टी गोंदळुन जातात. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वरखाली होत राहते आणि व्यक्ती संपूर्ण जागे राहत नाही किंवा झोपलेली असत नाहीत. 72 तास न झोपलेल्या व्यक्तीला विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. शिवाय त्यांना विचित्र भास होणे, थरथर होणे, झटके येणे, चुकीच्या आठवणी आणि स्नायूंचे दुखणे असा त्रास होऊ शकतो .
थोडे नवीन जरा जुने