स्तनांचा कर्करोग आणि आहार!

स्तनांचा कर्करोग हा भारतातील सर्वाधिक धोकादायक आजारांपैकी एक असून अत्यंत तरुण वयात महिलांमध्ये तो वाढू लागला आहे. जीवनशैलीतील अनियमित बदल आणि अयोग्य आहार यांच्यामुळे या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होऊ लागली असून लवकरच्या टप्प्यात निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो.

स्तनांचा कर्करोग या आजाराबाबत जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी ऑक्टोबर महिना जगभरात ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ’ म्हणून साजरा केला जातो. अनेक लोक स्तनांच्या कर्करोगाबाबत जागरूक आहेत, परंतु अनेक लोक पावले उचलायला आणि आजार सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्याच्या योजना करून योग्य आहार घेण्यास विसरतात. या गोष्टींनी स्तनांच्या कर्करोगाचा धोका टाळण्यास प्रत्यक्षात मदत मिळते.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)ने अंदाज वर्तवला आहे की, २०२० सालापर्यंत स्तनांच्या कर्करोगाच्या घटना मोठया प्रमाणावर वाढतील आणि आठपैकी एका महिलेला आपल्या आयुष्यात हा आजार होण्याचा धोका संभवू शकतो. स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या सुमारे ८५ टक्के महिलांना कौटुंबिक इतिहास नसतो, लवकर निदान झाल्यास स्तनांच्या कर्करोगातून ९८ टक्के महिला वाचू शकतात. एक सकस आहार आणि जीवनशैलीतील बदल यांच्यामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका सुमारे ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

आहारामुळे कर्करोगाचा धोका मोठया प्रमाणावर कमी होतो, असे दिसून आले आहे. योग्य आहार खाल्याने स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते, असे पुरावे मोठया प्रमाणावर दिसून आले आहेत.

काही आहार जसे तेलकस मासे (फोरेज फिश, साíडन, पेलाजिक इत्यादी) कर्करोगाच्या टय़ूमर्सच्या वाढीला आळा घालू शकतात तर इतर जसे हिरव्या पालेभाज्यांमध्ये असे घटक असतात, जे कर्करोगाला कारणीभूत होणा-या हार्मोन्सच्या वाढीला अटकाव करू शकतात.
आता आपण पाहूया महत्त्वाचे खाद्यपदार्थ जे तुमचे स्तनांच्या कर्करोगापासून संरक्षण करू शकतात

टोमॅटो

टोमॅटो लायकोपिनने समृद्ध असतात (टोमॅटो तसेच अनेक बेरी आणि फळांमध्ये असलेला कॅरोटेनॉइड पिगमेंट) जो कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यासाठी सिद्ध झाला आहे. टोमॅटो स्तनांच्या कर्करोगासाठी उत्तम फळ ठरले असून ते उच्च अँटिऑक्सिडंट पातळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरले आहेत.

ग्रीन टी

यात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाब कमी करू शकतात. व्हिटॅमिन सीचा जादा डोस त्यात टाकण्यासाठी लिंबू पिळा. त्यामुळे शरीरात अँटिऑक्सिडंट्स शोषून घेण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून हे दिसून आले आहे की, ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने स्तनांच्या कर्करोगाचा वेग कमी झाला आहे किंवा त्याला प्रतिबंधही झाला आहे.

हिरवी कडधान्ये

यात फोलेट्स, ‘ब’ जीवनसत्त्व असते जे स्तनांच्या कर्करोगाला आळा घालण्यास मदत करते. अख्ख्या धान्यापासून तयार केलेली उत्पादने जसे गहू, ब्राऊन राइस, मका, ओट्स, राय, बार्ली, नाचणी आणि ज्वारी हे सकस आहाराचा भाग आहेत. कारण ते जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, आहारातील फायबर आणि संरक्षण फायटोकेमिकल्सचे उत्तम स्रेत आहेत.

बीन्स आणि डाळी

तुमच्या आहारात भाज्यांच्या उत्तम प्रथिनांचा स्रेत आहेत आणि ते मसूर तसेच चणा यांच्यासारख्या बीन्स आणि डाळींमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते. त्यातून कॅल्शियम, लोह आणि ‘ब’ जीवनसत्त्वासारखे पोषक घटकही मिळतात.

लसूण

अ‍ॅलियम, लसूण आणि त्याच्याशी संबंधित (कांदा, लीक्स, स्कॅलिस्स आणि चिव्ह्स) असे पदार्थ कर्करोगाशी लढा देण्यासाठी समृद्ध आहेत आणि टय़ुमरची वाढ कमी करून स्तनांचा कर्करोगाचा धोका कमी करतात तसेच कोलोरेक्टल व प्रोस्टेट कर्करोग अशा कर्करोगांनाही आळा घालतात.

गडद हिरव्या पालेभाज्या

अभ्यास आणि प्रयोगातून हे दिसून आले आहे की, ही रसायने तुमच्या शरीरातील डीएनएचे नुकसान होण्यापासून आळा घालतात आणि पेशी मृत होण्यापासून टाळल्या जातात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. कॅरोटेनॉईड्स अँटीऑक्सिडेंट्सचे काम करून कर्करोगाला आळा घालू शकतात- म्हणजे संभाव्य धोकादायक फ्री रॅडिकल्स शरीरातून धोका निर्माण करण्यापूर्वी नष्ट करतात.

स्तनांचा कर्करोग हा भारतातील सर्वाधिक धोकादायक आजारांपैकी एक असून अत्यंत तरुण वयात महिलांमध्ये तो वाढू लागला आहे. जीवनशैलीतील अनियमित बदल आणि अयोग्य आहार यांच्यामुळे या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होऊ लागली आहे.

स्तनांचा कर्करोग लवकरच्या टप्प्यात निदान झाल्यास बरा होऊ शकतो. आम्ही सातत्याने जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे प्रत्येकासाठी निरोगी जीवनशैलीत गुंतवणूक करून खूप उशीर होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यावर भर दिला जात आहे.
थोडे नवीन जरा जुने