काळे हरभरे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीरकाळे हरभरे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यात आयर्न, सोडियम व सेलेनियम यांचा मुबलक साठा असतो. हरभ यातून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. 

रात्रभर भिजवून आणि मोड आणून हरभरे खाल्ल्यास त्याने व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सचे प्रमाणही सुधारते. हरभ-यातील प्रोटीन घटक शरीरातील ऊर्जा वाढवतात व अमायनो  एसिडमुळे पेशींचे नुकसान टळते. 

वाटीभर हरभ- यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. हरभ-यातील रेझीस्टंट स्टार्चमुळे पचन सुधारते तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहण्यास मदत करते. हरभ- यामुळे ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी हरभरा खाणे चांगले असते. आयर्नच्या कमतरतेमुळे एनिमियाची समस्या वाढते. हरभ-यातील आयर्न घटक हिमोग्लाबिन वाढवण्यास मदत करतात. यासाठी भिजवलेला हरभरा मधात मिसळून खावा. 

हरभ-यामुळे चेह -यावरील डाग , सूज, खाज येण्याची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा चमकदार होतो . हरभ-याचे पीठ दूध किंवा दह्यात मिसळून चेह-याला लावा व काहीवेळाने चेहरा धुवा.
थोडे नवीन जरा जुने