शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्यास करा हे उपाय
तुम्हाला रात्री झोपेत सतत कूस बदलावी लागते. काही केल्या झोप येत नाही आणि उठल्यानंतरही थकवा जाणवतो, शरीर जड झाल्यासारखे वाटते.शरीरात व घरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्याची ही लक्षणे आहेत. वेळीच काळजी घेतल्यास हा त्रास कमी करता येतो.
आहारात जास्तीत जास्त कच्च्या पालेभाज्या आणि फळांच्या रसाचा वापर करावा. सॅलड आणि ताज्या फळभाजांच्या ज्यूसचा अधिक वापर केल्याने शरीर आरामात डीटॉक्स (बाहेर टाकतो ) करतो.

सिंथेटिक रसायन असणारे वैयक्तिकसौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा. याच्यासाठी इतर पर्यायी वस्तूंचा वापर करावा. सौंदर्य प्रसाधने घेताना त्यामध्ये वापरलेल्या रसायनांची माहिती अवश्य घ्यावी.

सोनाबाथ केल्याने शरीरातून निघणार्‍या घामावाटे विषारी घटक बाहेर फेकले जातात, परंतु सोना रिजीम करण्यापूर्वी मार्गदर्शकाचा सल्ला जरूर घ्यावा.

मायक्रोवेव्हमध्ये तयार केलेले खाद्यपदार्थ खाण्याचे टाळा. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थांमधील प्रोटीन संरचना बदलते. जे शरीरासाठी हानिकारक असते.

शरीर लवचीक ठेवणे एक चांगला व्यायाम प्रकार आहे. स्ट्रेचिंगमुळे शरीराला बळकटी मिळते त्याप्रमाणे विषारी तत्त्वे बाहेर टाकण्यास मदत देखील होते. यासाठी तुम्ही योगा, ताईची किंवा की गॉग्नसारखे लवचीक व्यायाम करण्यास प्राधान्य द्यावे.

बहुतांश परफ्युम, सेंटेड कॅडल्स, रुम फ्रेशनरमध्ये मोठय़ा प्रमाणात विषारी घटक असतात. यामुळे शरीराच्या त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. परफ्युम किंवा तत्सम पदार्थ घेताना ते चांगल्या दर्जाचे आणि उत्तम प्रकारचा आहे काय हे तपासून पाहावे.
थोडे नवीन जरा जुने