पीसीओडीविषयी ही माहिती तुम्हाला माहित आहे ?

पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम (पीसीओएस), म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरिअन आजार ही समस्या सर्रास आढळत असून, प्रजोत्पादक वयोगटातील १० पैकी एका महिलेमध्ये ही आरोग्य समस्या दिसून येते.

प्रजोत्पादक हार्मोन्समध्ये झालेल्या असंतुलनामुळे निर्माण होणा-या या समस्येमुळे अंडाशयाची समस्या निर्माण होऊ शकते. अंडाशयामध्ये अंडी तयार केली जातात आणि निरोगी मासिक पाळीचा भाग म्हणून ही अंडी बाहेर सोडली जातात.

पीसीओएसमध्ये या क्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. पीसीओएसमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि यामुळे पाळीविषयक समस्या, वंध्यत्व (गर्भधारणा होण्याची अक्षमता) आणि अंडाशयामध्ये द्रवाने भरलेल्या गाठी विकसित होऊ शकतात.

पीसीओएस कुणाला होऊ शकतो?

प्रजननक्षम वयोगटातील ५% ते १०% महिलांना (१५ ते ४४ या दरम्यान) पीसीओएसची समस्या असते. अनेकदा, गर्भधारणा होण्यात किंवा मासिक पाळीविषयी प्रश्न निर्माण झाले की आपल्याला पीसीओएसचा त्रास असल्याचे महिलांनी विशीत किंवा तिशीत लक्षात येते. परंतु, पाळी सुरू झाल्यानंतर पीसीओएसचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. सर्व वंशाच्या व जातीच्या महिलांना पीसीओएसचा धोका असतो, परंतु तुम्ही स्थूल असाल किंवा तुमची आई, बहीण व मावशीला पीसीओएसचा त्रास असेल तर तुम्हालाही तो होण्याचा धोका अधिक असतो.

पीसीओएसची लक्षणे
अनियमित मासिक पाळी – मासिक पाळीच्या वेळी अधिक किंवा कमी रक्तस्रव होऊ शकतो, पाळी अनियमित येऊ शकते किंवा येतच नाही. परंतु, पूर्णत: सर्वसाधारण पाळी येत असूनही तुम्हाला पीसीओएसचा त्रास असू शकतो. चेहरा, हनुवटी आणि पुरुषांना साधारणत: ज्या भागांवर अधिक असतात तेथे भरपूर केस असणे. यास “हस्र्युटिझम” असे म्हणतात. पीसीओएस असलेल्या महिलांना हस्र्युटिझममुळे ७०% पयर्ंत फटका बसतो. तेलकट त्वचा व चेहरा, छाती व पाठीच्या वरच्या भागात पुरळ. केस पातळ होणे किंवा केस जाणे; पुरुषांप्रमाणे टक्कल पडू लागणे. वजन वाढणे किंवा वजन कमी करण्यात अडचणी येणे. त्वचा काळवंडणे, प्रामुख्याने मानेचा भाग, मांडीचा भाग व छातीच्या खाली. चामखीळ, म्हणजे काखेत किंवा मानेच्या भागात दिसणा-या छोट्याशा गाठी, झोपेची समस्या, थकवा, दमणूक, नैराश्य, चिंता, चीडचीड व मूड बदलणे, वंध्यत्वविषयक समस्या विस्कळित होतात.

मेटॅबोलिक सिंड्रोम – यामध्ये विविध लक्षणे समाविष्ट असतात, जसे की इन्सुलिन प्रतिकार, उच्च रक्तदाब व उच्च कोलेस्टेरॉल आणि यामुळे मधुमेह व हृदयाचे विकार होऊ शकतात

पीसीओएसचे व्यवस्थापन

व्यवस्थापनाच्या विविध पयार्यांमध्ये समाविष्ट आहेत – जीवनशैलीमध्ये बदल – यामध्ये संतुलित आहार, वजन कमी करण्यासाठी व ते टिकवण्यासाठी व्यायाम यांचा समावेश आहे

वजन कमी करणे – निरोगी आहार आणि नियमित व्यायाम यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीरातील इन्सुलिन कमी होते, इन्सुलिन वापरण्याच्या शरीराच्या पद्धतीत सुधारणा होते, हार्मोन्स नियमित होतात आणि पीसीओएसची लक्षणे आटोक्यात ठेवण्यासही मदत होते, तसेच प्रजननक्षमता सुधारते. शरीराच्या वजनात किान १०% घटही पुरेशी असते.

संतती नियंत्रण गोळ्या – गर्भधारणा होऊ नये म्हणून घेतल्या नाहीत तरी, संतती नियंत्रण गोळ्या ३-६ महिने घेतल्यास हार्मोन्सचे असंतुलन सुधारण्यास मदत होते, हस्र्युटिझम व चामखीळ यांना कारणीभूत ठरण-या टेस्टोस्टिरोनचे प्रमाण कमी केले जाते, मासिक पाळी नियमित केली जाते आणि गर्भधारणाही रोखली जाते

मेटफॉर्मिन – पीसीओएसमुळे वाढलेले शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण या औषधामुळे कमी करण्यासाठी मदत होते. हे औषध मधुमेहाच्या बाबतीतही वापरले जाते आणि संतती नियंत्रण गोळ्यांसोबत ते घेता येऊ शकते.

चामखीळवर उपचार करा – संतती नियंत्रण गोळ्या, टॉपिकल क्रीम, अँटिबायोटिक्स यांचा वापर केला जातो.

पीसीओएसमुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न
पीसीओएसमुळे आयुष्यात नंतर अनेक प्रकारचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात

मधुमेह – वयाच्या ४० वर्षांनंतर निम्म्याहून अधिक महिलांना (५०%) मधुमेह किंवा मधुमेह-पूर्व आजार होतो. निरोगी नसलेल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकार व स्ट्रोक यांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब, नैराश्य व चिंता, एंडोमेट्रिअल कॅन्सर/गर्भाशयाचा कॅन्सर,

संतुलित आहार

पोषक, अधिक फायबरयुक्त आहार, रिफाइन्ड काबोर्हायड्रेट्सचे प्रमाण कमी, निरोगी फॅट्स व अधिक प्रथिने

कमी प्रमाणात व अधिक वेळा खाणे

साखरयुक्त पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक, प्रक्रिया केलेले अन्न टाळणे

गोड पदार्थांऐवजी फळे खाणे : दररोज किमान २ वेळा तरी फळे खावीत

भाज्यांचे प्रमाण वाढवावे, दिवसातून किमान ५ वेळा
थोडे नवीन जरा जुने