हे करा केस गळण्याची समस्या दूर होईल, गेलेले केस पुन्हा येतील...कमी वयात केस गळणे हे सर्वांसाठी तनाव आणि चिंतेचे कारण असते. केस गळण्याची समस्या जर अनुवांशिक असेल तर त्याला एंड्रोजेनिक एलोसेसिया म्हटले जाते. अशा वेळी केस गळण्याची समस्या ही किशोरावस्थेपासुनच असु शकते. 

तर महिलांमध्ये ही समस्या 30 वर्षांनंतर निर्माण होते. याव्यतिरिक्त खाणे-पिणे, पर्यावरण प्रदुषण आणि औषधींच्या रिएक्शन किंवा अशा अनेक कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर ही समस्या दूर करण्याचे काही घरगुती उपाय आज आम्ही सांगणार आहोत.

1. जटामांसीला खोब-याच्या तेलात उकळुन घ्या. हे तेल थंड करुन एखाद्या बॉटलमध्ये भरा. रोज रात्री झोपण्याअगोदर या तेलाने मालिश करा. केसांचे अवेळी गळणे आणि पांढरे होणे दूर होईल.

2. मीठाचे अधिक सेवन केल्यानेही टक्कलपणा येतो. मीठ आणि मीरे पावडर एक-एक चमचा आणि पाच चमचे खोब-याचे तेल मिक्स करा. हे टक्कल असलेल्या ठिकाणी लावा. असे केल्याने केस पुन्हा येतील.

3. कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकुन पेस्ट बनवा. अंघोळी अगोदर ही पेस्ट डोक्यावर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या. काही दिवसांनंतर केस गळण्याची समस्या दूर होईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... अजुन कोणत्या घरगुती उपायांनी केस गळतीची समस्या दूर करता येते...

4. आवळ्याचे चुर्ण दह्यात मिळवा. ही पेस्ट हलक्या हातांनी केसांच्या मुळांना लावा. एका तासानंतर हे धुवून घ्या. आठवड्यातुन दोन वेळा नियमित असे केल्यास केस गळती कमी होईल.

5. दोन लीटर पाण्यात थोडा आवळा टाका आणि लिंबाचे पाने टाकुन पाणी उकळुन घ्या. आठवड्यातुन एक वेळा या पाण्याने केस धुवा. केस गळती थांबुन जाईल.

6. जर तुम्ही मादक पदार्थांचे सेवन किंवा धू्म्रपान करत असाल तर ते कमी करा. केस गळणे लवकर कमी होईल. जास्तित जास्त पाणी प्या. चहा-कॉफीचे सेवन कमी करा.


7. मोहरीच्या तेलात मेहेंदीची पाने टाकुन गरम करा. हे थंड करुन केसात लावा. नियमित हे लावल्याने केसांचे गळणे कमी होईल.

8. रात्री मेथीचे बीज पाण्यात भीजवा आणि हे सकाळी बारीक करुन केसांवर लावा. एका तासांनंतर केस धुवून घ्या. असे केल्याने काही दिवसात नवीन केस येतील.

9. खोब-याच्या तेलात कापूर मिळवा. केस धुन्याच्या एक तास अगोदर हे केसांना चांगल्या प्रकारे लावा. केस गळती थांबेल.

10. शिकाकाईच्या बीयांना पाण्यात टाकुन पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहु द्या. सकाळी ही पेस्ट केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. हे नॅचरल शाम्पूचे काम करते. याचा वापर केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. सोबतच केस निरोगी आणि चमकदार होतात.

11. अमरवेलला बारीक करुन त्याचा रस काढा. हा रस तिळाच्या तेला टाकुन उकळुन घ्या. जोपर्यंत पुर्ण रस तेलात मिक्स होत नाही तोपर्यंत तेल उकळा. रोज रात्री झोपण्याअगोदर हे तेल केसांना लावा. यामुळे टक्करपणाची समस्या दूर होते आणि केस सिल्की होतात.

12. मेथीच्या भाजीचे जास्त सेवन केसांसाठी चांगले मानले जाते. मेथीचे दाने रात्री पाण्यात भीजवा. सकाळी याची पेस्ट बनवुन घ्या. ही पेस्ट केसांमध्ये लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातुन दोनवेळा असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.


13. झेंडूच्या फुलांना बारीक करुन त्याचा रस काढा. हा रस खोब-याच्या तेलात मिळवुन उकळुन घ्या. यानंतर हे तेल थंड करुन बॉटलमध्ये भरुन ठेवा. असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल.

14. ऑलिव्ह ऑइल थोडे गरम करा. या तेलात बहेडा चूर्ण टाका. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. एक तासांनंतर केस धुवून घ्या. केस दाट होतील.

15. जास्वंदाच्या फुलांचा रस काढा. या रसाने केसांची मसाज करा. एका तासांनंतर केस धुवून घ्या. केस दाट, काळे आणि मजबूत होतील.
थोडे नवीन जरा जुने