३० मिनिटं चालण्याचे ३० फायदे


आपण सकाळी लवकर उठून ३० मिनिटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. कारण आपण दीर्घायुष्यी आहात व आपले आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.
» एकही पैसा खर्च न करता करता होणारा व्यायाम प्रकार

» सर्वाना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार

» कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार

» शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार

» सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो

» हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळ्च्या कोवळ्या उनातून मिळते

» चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो

» सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो

» चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते

» चालण्यामुळे झोपही चांगली लागते

» मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते

» वजन कमी करण्यास मदत होते

» चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात

» चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते

» दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे

» चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात

» झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो

» नियमित चालण्याची सवय असणा-यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी असते

» नियमित चालणा-यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते

» नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते

» नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्रवी ग्रंथीचे कार्य सुधारते

» हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते

» नियमित चालण्यामुळे कंबर, मांडया, पायाचे स्नायू मजबूत होतात

» मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

» नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो

» नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग

» चालण्यातून नराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते

» दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य तीन वर्षानी वाढते

» नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

» चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही आपल्याला नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच करावा.
थोडे नवीन जरा जुने