जाणून घ्या गाजराचे आरोग्यदायक फायदे

ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरतात. चवीला गोड असून डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं आहे ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरतात. चवीला गोड असून डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगलं आहे. कारण त्यात ‘अ’ जीवनसत्त्वाचा भरपूर साठा असतो. गाजराच्या देखील अनेक जाती असून भारतात प्रामुख्याने केशरी रंगाचं आढळतं. मात्र काही ठिकाणी ते जांभळं, लाल, पांढरं किंवा पिवळ्या रंगातही आढळतं. लोणचं, कोशिंबीर, हलवा किंवा सलाड अशा विविध रूपात भारतातच नव्हे तर अन्य काही देशांतही खाल्लं जातं. अशा या गाजराचे उपयोग पाहू या.

यात जीवनसत्त्व अ असल्याने दृष्टी सुधारण्याचं काम करते.

यातील बिटा कॅरोटिनमुळे शरीरातील पेशींचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम सुरळीत ठेवला जातो.

अँटी ऑक्डिडन्ट म्हणून काम करत असल्याने शरीरातील अनावश्यक फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात.

जीवनसत्त्व अ आणि अँटी ऑक्सिडन्टमुळे त्वचा काळवंडण्यापासून बचाव होतो. त्वचा, केस आणि नखांचा कोरडेपणा कमी होतो.

अकाली येणारं वार्धक्य कमी होतं.

कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून बचाव होतो.

याची पेस्ट करून चेह-यावर मास्क म्हणून लावल्यास त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचा तजेलदार दिसू लागते.
हृदयरोगापासून बचाव होण्यास मदत होते. आठवडय़ाला सहा गाजर खाणा-यांना अन्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी होतं.

किडनीचं आरोग्य सुधारून शरीरातील नको असलेलं द्रव्य बाहेर टाकण्याचं काम करतं.
कच्च गाजर खावं. कारण त्यामुळे दातात अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडून तोंड आणि दातांचंही आरोग्य सुधारतं.
थोडे नवीन जरा जुने