तोंडाच्या कॅन्सरसाठी प्रगत लेझर उपचारलेझरमुळे रुग्णाच्या रूपामध्ये काही फरक पडत नाही आणि त्यास शस्त्रक्रियेतून मिळते त्याच प्रमाणात चौथ्या टप्प्यातील कॅन्सरमधून मुक्तता मिळते. रुग्णांना दर्जेदार आयुष्यासाठी अधिक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या तोंडांच्या कॅन्सरवर कोणतेही समाधानकारक व अंदाजक्षम उपचार उपलब्ध नाहीत. अंतिम टप्प्यामध्ये त्वचा, स्नायू, हाडे व ४ सेमीहून अधिक लांबीचा ट्युमर यांचा समावेश असतो. या सगळ्या प्रकरणांमध्ये, आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता अतिशय अधिक असते, हे रुग्णांना माहीत असणे आवश्यक आहे.

शस्त्रक्रियेनंतर दोन महिने इतक्या कमी काळातही पुन्हा त्रास निर्माण होऊ शकतो. याला कितीही प्रमाणातील केमोथेरपी वा रेडिओथेरपी प्रतिबंध करू शकत नाही. प्रगत टप्प्यातील कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पॅलिएशन म्हणजे लक्षणांचे नियंत्रण ही पद्धत वापरली जाते.

गेल्या १५ वर्षापासून कॅन्सरवरील उपचारांमध्ये लेझरचा वापर केला जातो. परंतु, गेल्या पाच वर्षामध्ये, चांगले परिणाम दिसून येण्यासाठी लेझर पद्धती पुरेशी प्रगत झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅन्सरसाठी लेझर हा पॅलिएशनचा सर्वोत्तम प्रकार आहे आणि त्यामुळे कॅन्सर हाताळण्याचे स्वरूपच बदलून गेले आहे.

तोंडाचा कॅन्सर बरा करण्यासाठी व पॅलिएशनसाठी रुग्ण लेझरला पसंती देत आहेत. लेझरमुळे रुग्णाच्या रूपामध्ये काही फरक पडत नाही आणि त्यास शस्त्रक्रियेतून मिळते त्याच जवळजवळ प्रमाणात चौथ्या टप्प्यातील कॅन्सरमधून मुक्तता मिळते. रुग्णांना दर्जेदार आयुष्यासाठी अधिक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. त्यांना अल्पावधीतच सर्वसाधारण अन्न खाता येऊ शकते व यामुळे या आजाराचा सामना करण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढू शकते.

सुरुवातीला कोणतीही शस्त्रक्रिया गरजेची नसते. लेझरमुळे एकाच सत्रामध्ये ट्युमर आतल्या बाजूने ९०ते ९५% जाळला जातो. त्यामुळे रुग्णाच्या शरीराला केवळ १०% हून अधिक ट्युमरचा सामना करावा लागतो. त्यामुळे लेझरनंतर केमोथेरपी व रेडिओथेरपी असेशा पूरक उपचार अधिक प्रभावी ठरतात.

लेझरनंतर डोसही पूर्वीपेक्षा बराच कमी होतो. रुग्णाचा आहार व क्षमताही अबाधित राहते. शस्त्रक्रियेनंतर आजार लवकर पुन्हा उद्भवणे नियंत्रित करण्यासाठीही लेझरची मदत होते. २४ तासांमध्ये बहुतांश वेदना कमी होतात आणि चेहराही विद्रुप होत नसल्याने प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता भासत नाही. रुग्णाला २४ ते ४८ तासांमध्ये दिनचर्या सुरू करता येऊ शकते. वयस्कर रुग्णांसाठी आता हा उपचाराचा आदर्श पर्याय ठरतो आहे. जगभरातील डॉक्टरांना आता या वैद्यकीय घडामोडीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
थोडे नवीन जरा जुने