अभ्युदय को-आपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचे योगदान

मुंबई, दि.५ : - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 


या आवाहनाला प्रतिसाद देताना अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचे योगदान जमा केले.

अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट, माजी आमदार सीताराम घनदाट यांनी ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला.
थोडे नवीन जरा जुने