उन्हाळ्यात खा गुलकंदगुलाबाचे फूल जितकं नाजूक आणि मोहक आहे तितकंच त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला गुलकंद चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे.

जसजसा उकाडा वाढायला लागतो तसतसं पित्त, जळजळ, उष्माघात यासारखे आजार आपलं डोकं वर काढायला सुरुवात करतात. मग गर्मीपासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी आणि तृष्णाशामक गुलकंदच घ्या. या गुलकंदाचे आरोग्यदायी फायदे

पुढीलप्रमाणे –

शरीरात थंडावा निर्माण करण्याचं काम करतो.

 वाढत्या उकाडय़ामुळे शरीराचा होणारा दाह कमी होतो.

डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो.

पित्त, जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

गुलकंदामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो

त्वचा आरोग्यदायी बनवते. त्वचेच्या आरोग्यासाठी गुलाब फारच हितकारी आहे. गुलाबाचा मंद सुगंध आणि अँटिबॅक्टेरिअल गुणधर्मामुळे अनेक फेसपॅकमध्ये, आंघोळीच्या पाण्यात गुलाबाचा वापर केला जातो. गुलकंद खाल्ल्याने त्वचेचा पोत सुधारतो.

गुलकंदात गुलाबाबरोबर साखरही असल्याने शरीराला व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘ई’चा पुरवठा होतो.

जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचन उत्तम होण्यास मदत होते. उन्हाळ्यात होणारे पचकाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते. गुलकंद हे उन्हाळ्यात ऊर्जा देणारे एक उत्तम टॉनिक आहे.

घरच्या घरी कसा बनवाल गुलकंद?

 गुलकंद करण्यासाठी गावठी गुलाब वापरावेत. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेले गुलाब वापरू नयेत. आयुर्वेदिक उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं सांडू कंपनीचे गुलकंद उत्तम प्रतीचं, शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलेलं आणि प्रवाळयुक्त आहे.

गुलकंदासाठी गुलाब पाकळ्या आणि साखर समप्रमाणात घेऊन त्याचा एकावर एक थर घालून घ्यावा.

 मिश्रणाचे पातेलं झाकून आठवडाभर दिवसा सूर्यप्रकाशात तर नंतर सावलीत ठेवावे आणि दिवसातून एकदा चमच्याने ढवळून घ्यावे.

सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे गुलाबाच्या पाकळ्या साखरेच्या पाकात विघटित होतात. आणि गुलकंदाला लाल रंग येतो.

 मग तयार झालेल्या गुलकंदाचे तुम्ही नियमित सेवन करू शकता.

गुलकंदात साखरेचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींनी गुलकंद खाणं टाळावं.
थोडे नवीन जरा जुने