मधुमेह आणि विविध आजार.

मधुमेह म्हटलं की आपल्याला प्रथम धडकी भरल्याशिवाय राहात नाही. कारण या मधुमेहामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे बहिरेपणा आणि स्लीप अ‍ॅप्निया. या दोन आजारांशी मधुमेहाचा नेमका संबंध काय आहे हे जाणून घेऊया.


गेल्या दशकापासून भारतातील मधुमेहींच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. भारतात सुमारे ६५.१ दशलक्ष मधुमेही आहेत. इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशनने केलेल्या पाहणीनुसार २०१० साली ५०.८ दशलक्ष मधुमेही होते. रक्तशर्करेवरील नियंत्रणाचा अभाव, रक्तदाब आणि ब्लड लिपिड्स यामुळे अंतर्कर्णातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी बहिरेपणा येतो.

वेळी-अवेळी जेवण, अपायकारक जीवनशैली, शारीरिक हालाचालींचा अभाव, अतिरिक्त आहार आणि जीवनशैलीबाबत घेतलेल्या अनेक उत्स्फूर्त निर्णयांमुळे मधुमेहींच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.

जीवनशैलीतील अशा बदलांमुळे इन्सुलिनला विरोध निर्माण होतो आणि शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही. मी उपचार करत असलेल्या मधुमेहींपैकी १३ ते १५% मधुमेहींना बहिरेपणा आला आहे. विशेषत: ज्यांचे वय ४५ हून अधिक आहे आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रित आहे, अशांमध्ये ही शक्यता अधिक असते.

लक्षणे

याची सुरुवात कानाला कंड येण्यापासून होते आणि त्या व्यक्तीला कानात असाधारण आवाज ऐकू येऊ लागतो आणि हळुहळू ऐकू येणे पूर्ण बंद होते. मधुमेहींमध्ये सूक्ष्म वाहिन्यांना होणा-या रक्तपुरवठ्यावर परिणाम झालेला असतो. परिणामी, अंतर्कर्णामध्ये वेगाने झीज होते. यामुळे एका कानामध्ये लघु किंवा उच्च फ्रिक्वेन्सी होते. एखाद्या कानामध्ये प्रतिध्वनी ऐकू येत असेल तर मधुमेहीसाठी हे बहिरेपणा येण्याचे लक्षण असते.

उपाय


बहिरेपणा आल्यानंतर श्रवणयंत्र वापरणे हा एकच उपाय असतो. कानाची नियमित तपासणी करावी आणि दर दोन-तीन वर्षानी ऑडिओग्राम काढून घ्यावा हे हितावह आहे. बहिरेपणा हा व्यक्तीनुरूप बदलू शकतो. मधुमेह नसलेल्या व्यक्तींनाही बहिरेपणा येऊ शकतो, पण मधुमेहींमध्ये बहिरेपणा येण्याची शक्यता अधिक असते.
थोडे नवीन जरा जुने