तांब्याच्या भांडय़ातील पाणी शरीर निरोगी ठेवी




तांब्याच्या भांडय़ातून पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहतं हे केवळ आपण ऐकत आलो आहोत. मात्र त्याचे फायदे किती आणि नेमके कोणते आहेत हे मात्र कोणालाच माहिती नाही. यामुळे त्वचा निरोगी होते.

तांब्याच्या भांडय़ातून पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहतं हे केवळ आपण ऐकत आलो आहोत. मात्र त्याचे फायदे किती आणि नेमके कोणते आहेत हे मात्र कोणालाच माहिती नाही. यामुळे त्वचा निरोगी होते. सांध्यांना आराम मिळतो इतकंच नाही तर कॅन्सर, थायरॉईड, हृदय अशा विविध आजारांसाठी लाभदायक आहे.

निरोगी त्वचा

दररोज रात्री तांब्याच्या भांडय़ात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते प्यायल्याने त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात, त्याचबरोबर त्वचा, चेहरा उजळतो.

सांध्यांना आराम

दररोज सकाळी-संध्याकाळी तांब्याच्या भांडय़ात पाणी प्यायल्याने सांधेदुखी कमी होते,सांध्यांना मोठय़ा प्रमाणात आराम मिळतो.

वजन कमी करण्यास सहाय्यभूत

दररोज सकाळी-संध्याकाळी तांब्याच्या भांडय़ात पाणी प्यायल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.

बॅक्टेरिया नष्ट होतात

तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,यामध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो.

कॅन्सरचा धोका कमी होतो

तांब्याच्या भांडय़ातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

जखम ठीक होते

तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठीक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांडय़ातील पाणी प्यावे.

थायरॉईडचा धोका कमी होतो

तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.

हृदय मजबूत होते

तांब्याच्या भांडय़ात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्यायल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते.

अँसिडिटी नष्ट होते

तांब्याच्या भांडय़ात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील अँसिडिटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठीक राहते.

रक्त वाढण्यास मदत होते

तांब्याच्या भांडय़ातील पाणी नियमित पिण्याने तांब्यामधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते, त्यामुळे अ‍ॅनिमियाचा धोका टळतो.
थोडे नवीन जरा जुने