भाजलेल्या रुग्णांना आधार

भाजलेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी अनेक क्लिष्ट प्रक्रिया कराव्या लागतात. यात उपचारांच्या परिणामांवर जखमा बऱ्या होण्यास लागणारा कालावधी आणि व्रण हे सर्वात महत्त्वाचे निकष असतात. भाजण्याच्या प्रकरणात विशेषत: गंभीर जखम झाली असल्यास त्याचा रुग्णांवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. या जखमा भरून काढण्यासाठी अलीकडेच स्टेम सेल्सचा उपयोग करण्यात आला. स्टेम सेल्समुळे जखमा अधिक चांगल्या प्रकारे आणि लवकर भरू लागल्या, त्याचप्रमाणे दाह होणे कमी होते आणि व्रण व फायब्रॉसिसलाही प्रतिबंध होतो.

रामवर (नाव बदलले आहे) एका रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला स्टेमआरएक्स बायोसायन्सेस प्रा. लि.मध्ये दाखल करण्यात आले. कामाच्या ठिकाणी रसायन पडल्यामुळे शरीराच्या वरच्या भागातील ४५% भाग भाजलेला होता. या भाजण्यामुळे त्यांच्या शरीराला आणि चेहऱ्यावर काळपटपणा आला होता. सांध्यांच्या हालचालीवरही मर्यादा आली होती. त्वचेच्या बाय़पटलावर परिणाम झाला होता, चेहऱ्यावरील भाजण्याचे डाग हे द्वितीय श्रेणीतील आणि काही ठिकाणी तृतीय श्रेणीतील होते. परिणामी, त्वचेखालील उतींच्या रचनेवरही परिणाम होतो.

प्लेटलेट्स, पेशी, फायब्रोब्लास्ट्स, कोलाजेन आधारित जेल इत्यादींमधून तयार केलेल्या ग्रोथ फॅक्टर्सचा भाजण्यावरील उपचारांसाठी वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी खोलवर घाव आहेत, तिथे पीजीएलएच्या शीट्सना पेशी आणि ग्रोथ फॅक्टर्सनी मुलामा देण्यात आला. विविध प्रकारची औषधे आणि उपचार दररोज केले गेले आणि त्याची प्रगती नोंदवून ठेवण्यात आली. बंद ड्रेसिंग टाळले गेले. पद्धतशीर होमिओस्टॅसिस व्हावा यासाठी इंट्राव्हेनस पद्धतीने रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्स्फ्युजन) आणि पूरक द्रवपदार्थ देण्यात आले.

दोन दिवसांत त्यांच्यात लक्षणीय सुधारणा आढळून आली आणि सूज व काळसरपणा कमी होऊ लागला किंवा फिकट होत असल्याचे दिसून आले. पापणीची थोडीशी हालचाल दिसून आली आणि तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावरील भाजल्याच्या जखमा सुकू लागल्या आणि रामना (नाव बदलले आहे) त्यांचे तोंड आणि डोळे उघडता येऊ लागले. त्या जखमांमधून येणारा वासही सौम्य होऊ लागला.

उपचार केल्याच्या ५ व्या आणि ६ व्या दिवशी चेहरा आणि शरीरावरील खपली निघू लागली. पेशी आणि ग्रोथ फॅक्टरचा वापर करून उपचार केल्यानंतर आठवड्याभरातच नवीन त्वचा तयार होताना पाहून आनंद होऊ लागला. पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये या जखमा बऱ्या होण्यास किमान ८ महिन्यांचा कालावधी लागतो आणि चेहरा व शरीराच्या हालचाली सामान्य होण्यासाठी कित्येक महिने लागतात.

उपचारांनंतर दहाव्या दिवशी खपली पूर्णपणे गळून पडू लागली आणि १४ व्या दिवशी रुग्णाला त्वचेवर गुळगुळीतपणा किंवा जळजळण्याची जाणीव होत नव्हती. सांध्यांच्या हालचालीसुद्धा सुरळीत झाल्या होत्या. निरोगी त्वचा तयार होण्याचा वेगही नियमित झाल्याचे दिसून आले. जिथे भाजल्याचे घाव खोलवर होते, तेही भाग वेगाने बरे होऊ लागले आणि मला विश्वास आहे की महिन्याभरात आम्ही रुग्णाला पूर्ण बरे करू शकू आणि रुग्णाची प्रकृती एकदम सामान्य होईल.

या प्रकरणामध्ये भाजलेल्या घावांवर उपचार करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल करण्यात आला आाहे. भाजलेल्या प्रकरणांना हाताळणे आव्हानात्मक असते. कारण असे रुग्ण बरे होण्यास खूप काळ लागत असल्याने त्यांना येऊ शकणाऱ््या व्यंगाचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये रुग्ण बरा होतो पण व्रण राहतात आणि परिणामी काठीण्य येते.

त्याचप्रमाणे गुंतागुंत आणि प्रादुर्भाव होण्याची शक्यताही जास्त असते. शरीराची स्वत:ला बरे करण्याची नैसर्गिक क्षमता पाहता आम्ही उपचारांचा कालावधी कमी करतो आणि परिणाम झालेल्या उती पुन्हा तयार होण्यास वाव देतो. यामुळे पारंपरिक उपचार पद्धींमध्ये रुग्णावर येणारा मानसिक ताण आणि आर्थिक बोजाही कमी होतो.

स्टेम सेलवर आधारित उपचारांमुळे बहुतेक सर्व वैद्यकीय विभागांमध्ये नावीन्यपूर्ण आणि सक्षम उपचार करता येऊ लागले. त्यात भाजणे आणि घावांचे व्यवस्थापन याचाही समावेश आहे. स्टेम सेलमध्ये घाव बरे करण्याची आणि त्वचा तयार करण्याची प्रचंड क्षमता आहे हे सिद्ध झाले आहे.
थोडे नवीन जरा जुने