कॅन्सरच्या पलीकडचे आयुष्य...





कर्करोगाचे निदान आणि लवकर तपासणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निरोगीपणाकडे लक्ष केंद्रीत करण्याकरीता कर्करोगग्रस्त व्यक्तींना काळजी, समुपदेशन आणि पुनर्वसन प्रदान करण्यासाठी रुबी अहलुवालिया यांच्यामार्फत २०१२ मध्ये सुरू करण्यात आलेले संजीवनी कॅन्सर कॉऊन्सिलिंग अ‍ॅड रिहॅबिलेशन सेंटर आज हजारो कॅन्सरग्रस्तांकरिता मार्गदर्शक ठरत आहे.

संजीवनी सुरू करण्यापूर्वी रुबी स्वत: कॅन्सरच्या उपचारातून गेल्या होत्या. त्यांना स्वताला जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरने गाठले तेव्हा भावनकि दृष्टया त्या कोलमडून गेल्या होत्या, मात्र त्यांनी हार न मारता स्वतावरील उपचार तर पूर्ण केलेच शिवाय अशाप्रकारच्या रुग्णांना मार्गदर्शक आणि सहाय्यभूत ठरेल अशा संजीवनी केंद्राची निर्मिती करायचे ठरवले.

यात त्यांनी आवर्जून विविध क्षेत्रातील संचालकांचा सहभाग करून घेतला. ज्यात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उदा. ऑन्कोलॉजी, फायनान्स, कन्सल्टन्सी, चार्टर्ड अकाउंटेंसी, मॅनेजमेंट शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील आहेत.

रुग्णांवर उपचार आणि आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, कर्करोग पिडीत व्यक्तीचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहित करणे, आदी बाबतीत संजीवनी समुपदेशन करते. संजीवनी द्वारा कर्करोग पिडीतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना इस्पितळात अ‍ॅडमिट होण्याबाबत तसेच रुग्णांना त्यांचे उपचार पूर्ण करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांचे उपचाराचे आणि जीवन तसेच उपचारांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, आदी बाबत मार्गदर्शन केले जाते.

उपचार करताना आणि उपचार केल्यानंतरही या ठिकाणी रुग्णांना तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भावनिक, मानसिक आणि सहाय्यक आधार पुरविणे; रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसेच उपचारानंतरचे पथ्य पालन करण्यास प्रोत्साहित करणे, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात चांगले आणि अधिक अर्थपूर्ण संवाद साधणे अशा पध्दतीने कामकाज संजीवनीच्या विविध उपक्रमातून सुरू आहे.

एससीआरसी मुंबई, नागपूर, वर्धा, अहमदाबाद, बीकानेर, जयपूर, कोलकाता आणि पुडुचेरी येथे प्रादेशिक कॅन्सर रुग्णालये म्हणून सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालयात कार्यरत आहेत. संजीवनी कल्याण केंद्रांमधून प्रशिक्षित प्रशिक्षणाद्वारे मनोचिकित्सा, पोषण, भावनात्मक स्वातंत्र्य तंत्र, योग, ध्यान, संगीत थेरपी आणि नृत्य थेरपीवर आदान प्रदान करते.

याकरीता युवकांचा समावेश असणा-या संजीवनी युवा ब्रिगेड, स्तनाचा कर्करोगावरील पुस्तके यासारख्या सामग्री निर्माण करणे, कर्करोगाच्या जागरुकता, तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, कर्करोग पिडीतांना केअर ग्राइव्हरच्या परिषदा आणि कॅन-ए-थोंस, कॅन-अ‍ॅ-सवारी, वॉकॅथॉन, बाईक इ-स्पिनचे प्रतिबिंब दर्शविण्याकरीता विविध पातळीवर मॅरेथॉनसारख्या स्पर्धेत सहभागी करणे आदी कार्यक्रम राबवले जातात.

याशिवाय नातेवाईकांकरीता संजीवनीच्या माध्यमातून तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम राबवला जातो. या अवेअरनेस प्रोगॅममधून नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी, पथ्य, आणि तंत्र यांची वैद्यकीय माहिती दिली जाते, जेणेकरून पेशंट घरी गेल्यानंतरही शास्त्रीय पद्धतीनेच औषध पाणी घेऊ शकेल. हा अभ्यासक्रम मुंबईस्थित मेडिकल कॉलेज अन हॉस्पिटलच्या सहकार्याने चालवला जातो.
थोडे नवीन जरा जुने