घसा दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नकाअनेकांना ऋतू बदलतो तेव्हाच नाही तर वर्षभरही घसा दुखण्याचा त्रास होतो. अनेकाना घशात खाज सुटते. 


काहींना घशात गाठ असल्यासारखे वाटते त्यांचा आवाज बसतो. वेळीच काळजी घेतल्यास त्यातून कुठलाही आजार बळावण्याची शक्यता टाळता येऊ शकते.

अनेकदा घसा दुखण्यामुळे मानेत गाठ येणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे ही लक्षणे जाणवतात.

सर्दी किंवा सायनसमुळे घसा दुखू शकतो, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास, मोठ्याने बोलायची सवय असेल तर घसा दुखण्याची समस्या जाणवते.

यावर उपाय म्हणून गरम दुधात हळद घालून प्यावे. खडीसाखर किंवा हळद अणि गुळाची गोळी तोंडात ठेवावी. यावर उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, हे उपचार करू शकता.

सर्दीच्या औषधात स्युडो इफिड्रीन नावाचा एक घटक असतो, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. मधुमेह वाढू शकतो, हृदयविकार होऊ शकतो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधे घेऊ नये.
थोडे नवीन जरा जुने