संकट समयी दिलासा देण्यासाठी सलमान खान पुढे


व्हायरसचा सामना करण्यासाठी दबंग अभिनेता अर्थात सलमान खान देखील मैदात उतरला आहे. देशावर आलेल्या भीषण संकटाचा परिणाम हातावर पोट भरणा-या कामगारांच्या कुटुंबावर झाला आहे. त्यामुळे अशा कामगारांना संकट समयी दिलासा देण्यासाठी सलमान खान पुढे आला आहे. 

त्याने चक्क २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले आहे. त्यामुळे सलमान पुन्हा एकदा त्याच्या समाजसेवेसाठी चर्चेत आला आहे. २१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. परंतू १९ मार्चपासूनच सर्व चित्रपट आणि मालिकांचे शूटींग रद्द करण्यात आले होते. 

त्यामुळे चित्रपट, मालिका, वेबसीरिजमध्ये रोजंदारीवर काम करणा-या कामगारांच्या दोन वेळच्या जेवणाचे प्रचंड प्रमाणात हाल होत असल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी सलमानने मदतीचा हात पुढे केला आहे.
थोडे नवीन जरा जुने