चरबी हटवण्यासाठी करा हा ज्यूस फायदा होईलच ...



कारलं ही एक अशी भाजी आहे जी अनेकांना आवडत नाही. चवीला कारले कडू लागत असले तरी त्यात अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे वजन घटवण्यास कारल्याची मदत होते. रिसर्चमध्ये असा खुलासा झालाय की कारल्यामध्ये अशी तत्वे आहेत ज्यांच्या सेवनाने दीर्घकाळ भूक लागत नाही.

यात फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होते. जर तुम्ही वजन घटवण्यासाठी तुम्ही कडक डाएटिंग करत आहात आणि तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आहे तर कारल्याचा हा ज्यूस नक्कीच फायदेशीर ठरेल.

कारल्याचा ज्यूस बनवण्याची कृती

सर्वप्रथम कारली धुवून सोलून घ्या. त्यानंतर यात चिरा देवून आतील बिया काढा. आता कारल्याचे छोटे छोटे तुकडे करा. ३० मिनिटे हे तुकडे थंड पाण्यात ठेवा. त्यानंतर हे तुकडे मिक्समध्ये फिरवून घ्या. यात अर्धा चमचा मीठ आणि लिंबू टाकून नीट मिक्स करा.
थोडे नवीन जरा जुने