उन्हापासून त्वचेच संरक्षण कसे कराल ?


ऊन, धूळ आणि प्रदुषणामुळे त्वचेवर घातक परिणाम होतांना दिसतात. त्याचबरोबर बदलणा-या हवामानामुळेही त्वचेवर वाईट परिणाम होतांना दिसतात. सतत येणारा घाम आणि हवेतील दमटपणामुळे आरोग्यपूर्ण त्वचा आणि केस ठेवणे खूप कठीण काम होऊन बसते विशेष करून थोडे तास बाहेर राहिल्यास मोठीच समस्या निर्माण होते. पण काही छोट्या छोट्या टिप्सचा वापर केल्यास काही चांगले परिणामही दिसून येतात, तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतल्यास ती अशा दमट हवेतही दिवसभर तजेलदार राहण्यास मदत होऊ शकते.

आरोग्यपूर्ण त्वचा मिळवण्यासाठी काही परंपरागत आणि प्राचीन उपाय केल्यास नेहमीच हमखास चांगले परिणाम दिसून येतात. सात ते आठ तासांची आरोग्यपूर्ण झोप, योग्य आहार, तणावमुक्त आयुष्य जगणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, योग्य सनस्क्रीन्स, मॉईस्चरायझर्स चा वापर करणे, धुम्रपान आणि मद्यपान न करणे इत्यादी काही छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे तुमची त्वचा नक्कीच आरोग्यपूर्ण राहू शकते.

दुदैर्वाने आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तसेच प्रदुषणाने युक्त आयुष्यात त्वचेसाठी थोडा वेळ काढणे कठीण असते, पण तो काढावा लागतो. तुमची त्वचा आरोग्यपूर्ण करण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स खालील प्रमाणे आहेत.

त्वचेला वाफ देणे, रक्ताभिसरण सुधारणे आणि तजेलदार करणे – त्वचेला वाफ दिल्याने त्वचेतील मृत पेशी बाहेर तर निघतातच पण त्याचबरोबर चेह-याचे रक्ताभिसरण सुधारते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफॉईलेशन क्लेन्झर वापरल्यास त्वचा अधिक सुधारण्यास मदत होते. याकरता तुम्ही नैसर्गिक अशा संत्र्याची साले, कापलेल्या काकड्या किंवा सफरचंदाच्या सालांचा उपयोग करू शकता.

मॉइस्चराईझिंग – उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला ओलावा देणे खूपच आवश्यक असते. याकरता तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉईस्चराईझर घेऊन क्रिम किंवा लोशन किंवा ऑईनमेंट च्या स्वरूपात वापरून ते चेहरा, हात पाय आणि शरीरावर लावावे.

मेकअप काढणे – उन्हाळ्यात तुमची त्वचा अधिक चांगली रहावी याकरता किमान मेकअप असणे कधीही चांगले. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी मेकअप काढणेही खूपच आवश्यक असते. याकरता आयोनिक स्कीन क्लिीन्झर्स विशेषकरून अल्कोहोल बेस्ड वापरणे खूपच चांगले.

क्लेन्झिंग – आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार तुमची त्वचा स्वच्छ करण्याची गरज आहे. तुमची त्वचा कोरडी असल्यास तुम्ही ग्लिसरीन, सिटाईल अल्कोहोल, स्टेराईल अल्कोहोल आणि प्रोपेलिन ग्लायकॉल ने युक्त क्लेन्झर्स वापरावे तर तेलकट त्वचेसाठी कठोर अशा सॅलिसिलिक अ‍ॅसिडने युक्त क्लेन्सर्स वापरावी. तुम्ही घरी सुध्दा ताक, मध आणि लिंबाचा रस मिसळून घरीही तयार करू शकता व ते फेसपॅक प्रमाणे दिवसातून दोनदा ५-१० मिनिटांपर्यंत लावू शकता.

सनबर्न व्यतिरिक्त उन्हामुळे अनेक घातक परिणाम त्वचेवर होतांना दिसतात. अधिक काळ उन्हात राहिल्यास त्वचेमध्ये काही बदल घडतात यामध्ये सुरूकुत्या, त्वचा काळी पडणे, डाग, गाठी होणे (या गाठी कॅन्सरच्या नसतात), कॅन्सरपूवीर्ची किंवा कॅन्सरची वाढ यांचा समावेश आहे. खरे पाहता अधिकतर त्वचेच्या कॅन्सरचे प्रकार हे अधिक काळ उन्हात राहिल्याने झाल्याचे दिसून येते. सकाळी १० ते दुपरी ३ पर्यंत उन्हात जाणे टाळल्यास त्याचा अधिक लाभ होतो. पण जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही मोठी टोपी, लांब बाह्यांचा शर्ट आणि पॅंट घातल्यास त्याचा अधिक लाभ होऊ शकेल. ३० हून अधिक सन प्रोटेक्शन फॅक्टर असलेल्या तसेच यूव्हीए आणि यूव्हीबी ने युक्त सनस्क्रीनचा वापर हा दर २ ते ३ तासाने करून बचाव करू शकता.

नैसर्गिक घटकांचा वापर करा –
निसगार्ने नेहमीच त्वचेसाठी नेहमीच अनेक चांगल्या गोष्टी ठेवल्याआहेत. म्हणून नैसर्गिक घटकांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. अगदी सोपे उपाय तुम्हीकरू शकता, तुमच्या आहारात मक्याचा, बदाम, अक्रोडयांचा वापर करून तुम्ही स्क्रबिंग करू शकता. ऑरेंज पील, काकडी आणि फळांच्या सालींचा उपयोगही तुम्ही करू शकता. अधिक प्रमाणात क्रीम, योगर्ट, ग्लिसरिन यांचा वापर करून मॉईस्चराईजिंग करू शकता आणि त्वचा घट्ट करण्यासाठी अंड्याच्या योकचा वापर करू शकता.

रासायनिक पिल्स आणि त्यांचे लाभ

केमिकल पिल्स तंत्राचा वापर करून तुम्ही तुमचा चेहेरा, मान आणि हातांच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. केमिकल पिल्स मुळे त्वचेला अधिक लाभ होऊ शकतात जसे यामुळे अधिक खोलवर स्वच्छता मिळून, मुरूमे कमी होतात, त्वचा अधिक मुलायम होते आणि त्याचबरोबर सुरकुत्या कमी होऊन त्वचा अधिक तजेलदार बनते. तुम्ही भोपळ्याच्या सालीचा वापर करून अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी बरोबरच बिटा कॅरोटिन तसेच जस्त आणि पोटॅशिअम ही मिळवू शकता.

भोपळ्याचा दोन मोठे चमचे गर घेऊन त्यांत अर्धा चमचा मध, एक चमचा योगर्ट/ऑलिव्ह ऑईल एकत्र करून ते तुमच्या त्वचेवर लावू शकता. तजेलदार त्वचा मिळवणे अतिशय सोपे काम आहे आणि हे सोपे तंत्र सातत्याने केल्यास खूप लाभ होतांना दिसून येतो.
थोडे नवीन जरा जुने