फादर्स मानसिक ताणतणावाच्या विळख्यात



मानसिक ताणतणाव म्हणजे आजच्या युगाचे अविभाज्य अंग असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आधुनिक जीवनशैलीमुळे आपले आयुष्य एखाद्या यंत्रमानवासारखे झाले असून कायम तणावग्रस्त राहिल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग अशा आजारांना अनेक नागरिक बळी पडत आहेत.

या शिबिरात भाग घेतलेल्या ४० पालकांमध्ये झोपेच्या तक्रारी, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, छातीत दुखणे, केस गळणे, वारंवार पचनाच्या तक्रारी उद्भवणे, दम्याचा त्रास, वजन वाढणे किंवा कमी होणे असे आजार आढळून आले. या पालकांवर स्टìलग वोक्हार्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी यावर पुढील वैद्यकीय उपचार सुचविले असून ताणतणावांचं व्यवस्थापन कसे करावे यावरही मार्गदर्शन केले.

याविषयी अधिक माहिती देताना स्टìलग वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. मेहुल कालावाडिया म्हणाले, ‘‘लॅपटॉप व स्मार्टफोनच्या विळख्यात आजचे पुरुष इतके अडकले आहेत की घरी आल्यावरही कार्यालयातील काम संपत नाही. इतकेच काय तर अनेकदा लॅपटॉपवर उशिरापर्यंत काम करावे लागते.

कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेले असताना बॉसच्या मेलला उत्तर द्यावे लागते. यामुळे नकळत कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होतात व ताण वाढत जातो. याशिवाय आपल्या आयुष्यातले विरोधाभास सुद्धा या मानसिक ताणतणावात भरच घालतात.

बाहेरून घरी येताना पाहिलेलं झगमगीत जगणं आणि आपली राहती वस्ती आणि तिचा बकालपणा, वस्तीतलं नकारात्मक वातावरण, त्यातच असलेलं आपलं लहानसं घर, महागाईमुळे मुलांच्या उच्च शिक्षणात आलेल्या अडचणी या मानसिक ताणतणाव वाढविण्यास हातभार लावतात, याचबरोबर घटस्फोट, जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू, नोकरीतील आव्हाने, उशिरा झालेले लग्न व नवीन घर घेणे अशी नवीन कारणेही समोर आली आहेत.’’
थोडे नवीन जरा जुने