तरुणांमध्ये वाढतेय सांधिवाताचे प्रमाण
हिवाळ्यात यावर्षी २० ते ३० टक्के सांधेदुखीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हिवाळा म्हटलं की आरोग्यासाठी योग्य असा ऋतू असून या काळात आहार आणि व्यायामावर लक्ष दिले जाते.

हिवाळ्यात यावर्षी २० ते ३० टक्के सांधेदुखीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. हिवाळा म्हटलं की आरोग्यासाठी योग्य असा ऋतू असून या काळात आहार आणि व्यायामावर लक्ष दिले जाते. पण तरुणाई फास्ट जीवनशैलीमुळे आरोग्यासाठी तेवढा वेळ देत नसल्याने विविध आजारांना सामोरी जातेय.

हिवाळ्यात सांधेदुखी वाढवणारी रसायने शरीरातील वेगवेगळ्या सांध्यांमध्ये एकत्रित आल्याने दुखण्याच्या प्रमाणात नेहमी वाढ होते. या थंडीच्या कालावधीत होणा-या सांधेदुखीचे वेगवेगळे प्रकार तरुणांमध्ये आढळून आले आहेत.

त्यापूर्वी ६० वर्षे वयोगटावरील व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास होत असे, पण आता हे प्रमाण ३० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना होताना दिसत आहे.

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरण्याने आपल्याला ‘व्हिटामिन डी’ मिळते. त्यामुळे सांधेदुखी कमी होऊ शकते. हिवाळ्यात सांधेदुखी असल्यास शरीराला उबदार ठेवा. तसेच

डॉक्टरांकडे वारंवार जाऊन योग्य औषधोपचार व आहार घ्या.

संधिवात असणा-या रुग्णांनी सामान्यत: हे करावे. डॉक्टरांकडे जाऊन योग्य औषधोपचार घ्यावेत, व्यायाम व योगासने करावी. पौष्टिक अन्न घेणे. अशाने संधिवात आटोक्यात येऊ शकतो.

‘संधिवात हा एक अनुवंशिक रोग असून बहुतांश रुग्णांमध्ये तो आढळून येतो. पूर्वीच्या काळी संधिवाताचे लवकर निदान न झाल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असे. बसून काम करणे, जेवणाकडे दुर्लक्ष, व्यायाम न करणे, शारीरिक कष्टाची कामे न करणे ही तरुणांची जीवनशैली असल्यामुळे त्यांच्यामध्ये संधिवाताचे प्रमाण वाढले आहे.

डेंग्यू व चिकनगुनिया झाल्यानंतर पोस्ट संधिवात झाल्याचे विशेषत: तरुणांमध्ये निदर्शनास आले आहे. डेंग्यू व चिकनगुनियानंतर सांधेदुखी व त्यावर सूज येते.
थोडे नवीन जरा जुने