मक्याचं कणीस खायला जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते आरोग्यासाठी फायदेशीर...


मक्याचं कणीस खायला जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते आरोग्यासाठी उत्तम असतं.

शरीराला ऊर्जा मिळते 
मक्याच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते. शिवाय यामध्ये कार्बोहायड्रेटदेखील अधिक असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासोबतच मेंदू आणि त्याचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. कारण एक कप मक्याच्या दाण्यांमध्ये २९ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. म्हणूनच जर तुम्ही खेळाडू असाल अथवा तुम्ही शारीरिक मेहनत अधिक घेत असाल तर तुम्हाला मक्याचे कणीस खाण्याची अत्यंत गरज आहे. 

सर्दीचा त्रास कमी होतो 
पावसाळा आला की सर्दी, खोकला ही आजारपणे आपोआप पाठी लागतात. कधी पावसात भिजल्यामुळे, तर कधी बदललेल्या वातावरणामुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होतो. जर तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल आणि नाक बंद झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा उपाय जरूर करा. मका खाऊन झाल्यावर उरलेल्या कणसाचे दोन तुकडे करा आणि त्याच्या आतील भागाचा वास घ्या. मक्याच्या गंधाने तुमचे बंद नाक मोकळे होण्यास मदत होईल. 

वजन नियंत्रणात राहते 
वजन जास्त असेल आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय करून तुम्ही थकला असाल तर मक्याचे दाणे तुमच्यासाठी फायद्याचे आहेत. कारण मक्याच्या दाण्यांमध्ये पुरेसे फायबर असते. यासाठी दररोज नाष्ट्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे खा. ज्यामुळे तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहील आणि तुम्ही नको असलेले पदार्थ कमी प्रमाणात खाल. साहजिकच पौष्टिक मक्याचे दाणे खाण्याने तुमचे योग्य पोषणदेखील होईल.

अ‍ॅनिमियावर गुणकारी 
अ‍ॅनिमियाचे सर्वात महत्त्वाचे कारण रक्ताची कमतरता हे आहे. रक्त कमी असल्यामुळे तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटते. मात्र, मक्याच्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12, लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. मक्याचे दाणे नियमित खाण्यामुळे तुमचा अशक्तपणा कमी होऊ शकतो.

गरोदरपणात उपयुक्त
गरोदर महिलांनी त्यांच्या आहारात मक्याच्या दाण्यांचा जरूर समावेश करावा. कारण यामुळे तुमचे आणि तुमच्या गर्भाचे योग्य पोषण होते. कारण मक्यात फॉलिक अ‍ॅसिड भरपूर असते, जे गरोदर महिलांसाठी उपयुक्त असते.

कर्करोगापासून बचाव
आजकाल कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. मात्र, जर तुम्हाला कर्करोगापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर मका जरूर खा. एका संशोधनानूसार मक्याच्या दाण्यांमधील अँटीऑक्सिडंट कर्करोगापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे विशेषतः यकृत आणि स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

कोलेस्टेरॉल नियंत्रित
माणसाच्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉल आणि गुड कोलेस्टेरॉल असे दोन प्रकार असतात. जर बॅड कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयरोगाचे प्रमाण वाढते. मात्र, गुड कोलेस्टेरॉल नियंत्रित असेल तर शरीर निरोगी राहते. मक्याच्या दाण्यांमुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

पचनशक्ती सुधारते
मक्याच्या दाण्यांमध्ये आणि मक्याच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन चांगले होते. यासाठी जेवताना मक्याचे सॅलड जरूर खा.
थोडे नवीन जरा जुने