...आजारापासून बचाव करण्यासाठी मग्नेशिअम आवश्यक!
आपल्या शरीराचा विविध आजारापासून बचाव करण्यासाठी मग्नेशिअम या खनिजाची आवश्यकता असते. म्हणूनच शरीराच्या जडणघडणीत मॅग्नेशिअमचं महत्त्व अधिक आहे. ते कोणत्या पदार्थातून मिळू शकतं. हे जाणून घेऊ या.

आपण नेहमी म्हणतो की आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषणमूल्यांची आवश्यकता असते. त्यातही शरीराला भरपूर प्रमाणात मिनरल्स अर्थात खनिजांची अवाश्यकता असते. या खनिजांपैकी मग्नेशिअम हे महत्त्वाचं खनिज होय. हे आपल्या शरीराला का महत्त्वाचं आहे तसंच ते आपल्याला कोणत्या पदार्थामधून मिळेल हे पाहू या.
काही पदार्थाचा तुम्ही तुमच्या आहारात नियमित समावेश केल्यास तुम्हाला आपोआप मॅग्नेशिअम मिळू शकतं. केवळ मॅग्नेशिअम मिळवण्यासाठी वेगळं काही घ्यायची जरूरतही लागत नाही.


दही

यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचा उत्तम स्रेत असतो.

केळं

यात पोटॅशिअमच्या सोबत मॅग्नेशिअमचादेखील भरपूर स्रेत असतो. आपली पाचक शक्ती मजबूत करण्याचं काम केळं करतं. याचबरोबर स्मरणशक्ती वाढवण्याचं कामही ते करतं.

सीताफळाच्या बिया

या बियांमध्ये याचा भरपूर स्रेत असतो. या बिया उन्हात वाळवून त्याला तेल आणि मीठ लावून भाजून घ्या आणि ते नियमित सेवन करा. शिराला आवश्यक असणारं मॅग्नेशिअम तुम्हाला यातून मिळेल.

बदाम

सगळ्यात उत्तम स्रोत म्हणजे बदामच म्हणावं लागेल. पाण्यात भिजवलेले पाच बदाम दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. त्याचप्रमाणे चेतासंस्था सुधारते. जेणेकरून चेतासंस्थेचे संबंधित आजरापासून बचाव होतो.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये लोह असतं हे आपल्याला माहितीच आहे. पण त्याचबरोबर मॅग्नेशिअमदेखील भरपूर प्रमाणात मिळतं. शरीराला आवश्यक असणा-या हिमोग्लोबिनमध्ये वाढ करण्याचं काम करतं. त्याचबरोबर स्नायूंनादेखील मजबूत करण्यात मदत करतं.

कडधान्य

न्याहारीत मोड आलेले मूग आणि चणे खाल्ले तर शरीराचा मेटाबोलिजम सुधारतो.

फायदे काय आहेत?

कॅल्शिअमप्रमाणेच हे एक क्षार आहे. नुकत्याच केलेल्या सव्‍‌र्हेक्षणानुसार असम सिद्ध झालं आहे की शरीरात असलेल्या एन्झाइमबरोबर मिसळून ग्लुकोज करण्याचं काम करतं. इन्सुलिन करण्याच्या प्रक्रियेतही दुरुस्त करतं. मॅग्नेशिअमचा स्रेत असलेल्या पदार्थाचं सेवन केल्यामुळे टाईप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो.

जेणेकरून स्मरणशक्ती मजबूत होते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, हृदयविकार, ताण, माइग्रेन आणि अथ्र्रायटिससारख्या विविध समस्यांपासूनही बचाव करण्यास साहाय्य मिळते. त्याचप्रमाणे कॅल्शिअमसोबत राहिल्याने हाडांची मजबुतीही होते. गरोदर स्त्रियांसाठी हे आवश्यक आहे, कारण यामुळे बाळाची वाढ उत्तम होते.
थोडे नवीन जरा जुने